Ad will apear here
Next
पुणे प्राईड पुरस्कार सोहळा
प्रमुख पाहुणे डॉ. बाबा कल्याणी, आर. के. अग्रवाल यांच्यासोबत सल्लागार मंडळाचे सदस्य व पुरस्कारप्राप्त मान्यवर

पुणे : रेसिडेन्सी क्लबला नुकतीच २६ वर्ष पूर्ण झाली असून, संस्थेचा 'पुणे प्राइड अॅवॉर्डस्' हा दिमाखदार सोहळा नऊ डिसेंबर रोजी पार पडला. हा सोहळा 'रेसिडेन्सी क्लब ब्रह्माकॉप'चे अध्यक्ष आर. के. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आणि पुणे शहरासाठी अभिमानस्पद अशा व्यक्तींचा सन्मान करण्यात आला आणि त्यांना पुणे प्राइड अॅवॉर्डने गौरविण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्य अतिथी डॉ. बाबा कल्याणी यांचा परिचय पद्मश्री लीला पूनावाला यांनी करून दिला. त्यानंतर आर. के. अग्रवाल यांनी डॉ. बाबा कल्याणी आणि डॉ. अजय चंदनवाले यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला. अग्रवाल यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉ. बाबा कल्याणी यांच्या हस्ते श्रीमती सुमित्रा भावे यांना 'जीवन गौरव पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. कॉर्पोरेट क्षेत्रातील कामगिरीसाठी हनमंत गायकवाड, समाज कार्यासाठी डॉ. विनोद शहा, कला आणि संस्कृती क्षेत्रासाठी उस्मान खान, शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रा. एम. एस. वाडिया व क्रीडा क्षेत्रासाठी गौरी गाडगीळ यांनाही कार्यक्रमात पुरस्कार देण्यात आला.
देशाच्या सुरक्षिततेसाठी शहीद झालेल्या शूर सैनिकांच्या पत्नींना या कार्यक्रमात कर्नल संभाजी पाटील यांच्या हस्ते शिलाई मशीन देऊन गौरविण्यात आले.  

डॉ. एस. बी. मुजुमदार, विठ्ठल मनियार, डॉ. के. एच. संचेती, लीला पूनावाला, संभाजी पाटील, सबिना संघवी, व्ही. एम. मस्के, सुभाष सणस, डॉ. मोहन आगाशे, चंद्रकांत बोर्डे यांनी पुरस्कारासाठीच्या सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहिले. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZWDBJ
Similar Posts
‘वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन’चे आयोजन पुणे : बांधकाम व पायाभूत क्षेत्रात होणाऱ्या चांगल्या दर्जाच्या कामाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया,पुणे सेंटरतर्फे दरवर्षी ‘वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन’चे आयोजन केले जाते. यंदाही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर आहे.
साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम पुणे : पुण्यामध्ये येत्या रविवारी २८ जानेवारी रोजी ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य, त्यांची विक्रमी विक्री यातून सुरू झालेले विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, लोकजीवन आणि ग्रामीण शहरी जीवनशैलीचा समन्वय
‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ पुणे : ‘संशोधन क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामुळे आता होणारे संशोधन हे शास्त्रीयदृष्टया योग्य असले, तरी ते एकांगी पद्धतीचे आहे. विविध प्रकारच्या संशोधनांमध्ये महिलांचा सहभाग वाढला तर संशोधनाचे स्वरूप बदलेल,’ असे मत जीवशास्त्र विषयातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’च्या (आयसर) शास्त्रज्ञ डॉ
‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर पुणे : सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील हरिश्चंद्रगडचा कोकण कडा, नागफणी, नानाचा अंगठा, मोरोशीचा भैरावगड, माहुलीचा बाण, नवरा-नवरी अशा अनेक सुळक्यांवर यशस्वी चढाया करणाऱ्या तसेच नाशिक त्रिंबकेश्वर पासून ते आंबोली पर्यंतच्या साह्यवाटा आणि गडकिल्ल्यांच्या यशस्वी मोहीमा राबवून तरुण पिढीला  गिर्यारोहण क्षेत्रामध्ये

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language